Wednesday, February 4, 2026
Homeक्रीडाAsia Cup 2025 IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाचे...

Asia Cup 2025 IND vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाचे टेन्शन वाढलं; नेमकं काय झालं?

मुंबई | Mumbai

आशिया चषक क्रिकेट (Asia Cup 2025) स्पर्धेमध्ये रविवारी (दि.२८ सप्टेंबर) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना खेळविण्यात येणार आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघाबाहेर बसावे लागू शकते.

- Advertisement -

श्रीलंकेविरुद्ध (SriLanka) शुक्रवारी सुपर ४ मध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याला स्नायूंना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले होते.विशेष म्हणजे हार्दिक पांड्याने केवळ १ षटकच गोलंदाजी केली होती.

YouTube video player

दरम्यान, भारतीय संघाचे (Indian Team) गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्कलने याबद्दल दुजोरा दिला आहे. तो म्हणाला की, अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्याला क्रॅंप आले. शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) तपासणी करू. विशेष म्हणजे मॉर्कलने स्पष्ट केले की, अभिषेक शर्मा पुर्णपणे तंदुरुस्त आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...