Monday, June 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी (दि. २८) लॉर्डस् लंडन येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये (India and Australia) हाय व्होल्टेज सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय कर्णधारपद अष्टपैलू हरमनप्रीत कौरकडे तर सोफी मोलिनेक्सकडे ऑस्ट्रेलिया संघाचे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघाला पराभूत केले आहे.

- Advertisement -

सलग चार विजय (Won) संपादन केल्यामुळे आणि सरस नेट रनरेटमुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र दुसऱ्या स्थानासाठी भारत, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश शर्यतीत असून, अधिक चुरस निर्माण झाली आहे. भारतीय संघाच्या (Team India) खात्यात सहा गुण जमा असून, सरस नेट रनरेटमुळे सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. उभय संघांमध्ये ३५ सामने खेळले गेले असून, भारतीय संघाने आठ तर ऑस्ट्रेलियाने २६ सामन्यांत सरशी साधली आहे.

तर दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेमध्ये सहा सामने खेळले गेले असून, भारतीय संघाने दोन सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात (Month) खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ आशा फरकाने मालिका विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी ऑस्ट्रेलियाकडे असणार आहे.

प्रमुख खेळाडू : जॉर्जिया वोल, अॅनाबेल सदरलँड, हर्मनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा.

ताज्या बातम्या

Bribery News : घरकुलाच्या दुसर्‍या हप्त्यासाठी हजाराची लाच

0
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur पंचायत समितीमध्ये (Vaijapur Panchayat Samiti) कार्यरत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला (Rural Housing Engineer) पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता (Gharkul...