Tuesday, September 22, 2026
Homeक्रीडाIndia vs Japan : भारताचा जपानवर २ धावांनी निसटता विजय; टी-२० आंतरराष्ट्रीय...

India vs Japan : भारताचा जपानवर २ धावांनी निसटता विजय; टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवला २०० वा ऐतिहासिक विजय

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि जपान (India vs Japan) यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने यजमान जपानवर २ धावांनी निसटता पण रोमहर्षक विजय (Won) मिळवला. या विजयासह भारतीय संघाने (Team India) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आपला २०० वा सामना जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रमही गाठला आहे.

- Advertisement -

पावसाचा व्यत्यय आणि ५-५ षटकांचा सामना

सानो मैदानावर पार पडलेल्या या सामन्यावर पावसाचे (Rain) सावट होते. पावसामुळे आणि ओल्या आऊटफील्डमुळे सामना सुरू होण्यास तब्बल अडीच तासांचा विलंब झाला. अखेर पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी करून सामना प्रत्येकी ५-५ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला.

भारताची ढेपाळलेली फलंदाजी अन् ३२ धावांचे आव्हान

नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय सलामीवीरांची सुरुवात निराशाजनक झाली. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा शून्य धावांवर तर संजू सॅमसन (९) आणि ईशान किशन (३) स्वस्तात तंबूत परतले. कर्णधार श्रेयस अय्यरने एका बाजूने संघर्ष करत सर्वाधिक १६ धावांची योगदान दिले. यामुळे भारतीय संघाला निर्धारित ५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३२ धावांपर्यंत (Runs) मजल मारता आली.

जपानचा संघर्ष आणि अक्षर पटेलचे निर्णायक शेवटचे षटक

३३ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना जपानची सुरुवातही खराब झाली. पहिल्याच षटकांत लॅचलन यामामोटो (१) धावचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने इब्राहिम ताकाहाशीला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले. चौथ्या षटकात केंडल काडेवाकी फ्लेमिंगने १२ धावा करत जपानच्या आशा जिवंत ठेवल्या, परंतु त्यालाही सुंदरने बाद केले. शेवटच्या षटकात जपानला विजयासाठी ८ धावांची आवश्यकता होती. कर्णधार श्रेयस अय्यरने ही जबाबदारी अष्टपैलू अक्षर पटेलकडे सोपवली. त्याच्या अखेरच्या चेंडूवर जपानला जिंकण्यासाठी ४ धावांची गरज होती. मात्र, अलेक्झांडरला शेवटच्या चेंडूवर केवळ १ धावच काढता आली. अशा प्रकारे भारतीय संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.
कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या आणि संघासाठी सर्वाधिक १६ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला ‘सामनावीर’ (मॅन ऑफ द मॅच) पुरस्काराने गौरविण्यात आले.

ताज्या बातम्या