मुंबई | Mumbai
आशिया चषक क्रिकेट (Asia Cup 2025) स्पर्धा आटोपल्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) क्रिकेट संघांमध्ये द्विपक्षीय मालिका (Series) खेळविण्यात येणार आहे. उभय संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामने खेळविण्यात येणार असून, मालिकेची सुरुवात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होणार आहे.
१९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ही मालिका खेळविण्यात येणार आहे. एकदिवसीय सामने पर्थ,अॅडिलेड आणि सिडनी क्रिकेट मैदानावर (Ground) खेळविण्यात येणार आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०० वाजता सामने सुरू होणार आहेत.
दरम्यान, एकदिवसीय मालिका आटोपल्यानंतर ५ सामन्यांची टी २० मालिका खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता टी २० सामने खेळविण्यात येणार असून, हे सामने कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, बिल पिपेन ओव्हल गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत.




