मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( Board of Control for Cricket in India) आज (बुधवारी) ३ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या टी २० मालिकेसाठी (T 20 series) भारतीय संघाची (Team India) घोषणा केली आहे.
या मालिकेत भारताचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे. तर मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या संघात परतले आहेत. मात्र, डावखुरा फलंदाज रिंकूसिंगला मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. या मालिकेला ९ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
भारतीय संघ खालीलप्रमाणे
सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, अभिषेक शर्मा,शिवम दुबे,अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन,वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा, अर्शदिपसिंग, कुलदीप यादव, वाॅशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह




