Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : वानखेडेवर आज मुंबई-चेन्नई भिडणार; विजयी षटकार कोण मारणार?

IPL 2026 : वानखेडेवर आज मुंबई-चेन्नई भिडणार; विजयी षटकार कोण मारणार?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) आता निर्णायक टप्प्यावर आली असून, आज (गुरुवारी) क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी फाईट पाहायला मिळणार आहे. आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians and Chennai Super Kings) आज सायंकाळी ७.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) आमनेसामने येतील.

- Advertisement -

दोन्ही संघांनी (Teams) आतापर्यंत प्रत्येकी ५ वेळा विजेतेपद पटकावले असून, यंदा विजेतेपदाचा षटकार मारण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील.चाहत्यांसाठी सर्वात मोठी उत्सुकता माजी कर्णधारांच्या तंदुरुस्तीबाबत आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरलेला रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करत आहे. मात्र, तो हा सामना खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय नाणेफेकीच्या वेळी घेतला जाईल.

माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. धोनीने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर जवळपास अर्धा तास यष्टीरक्षण आणि फलंदाजीचा कसून सराव केला. यावेळी तो मोठे मोठे आक्रमक फटके मारताना दिसला. धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ताफ्यात दाखल झाला तर चेन्नई सुपर किंग्ज संघाची फलंदाजी अधिक मजबूत होणार आहे.

दोन्ही संघांसाठी ‘करा किंवा मरो’ची स्थिती

यंदाच्या मोसमात दोन्ही संघांचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स ६ सामन्यांपैकी २ विजयांसह ७ व्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज ६ पैकी २ सामने जिंकून ८ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजचा विजय दोन्ही संघांसाठी अनिवार्य आहे.

चेन्नईला मोठा धक्का; आयुष म्हात्रे स्पर्धेबाहेर

चेन्नईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याने ६ सामन्यांत २०१ धावा करत चेन्नईच्या फलंदाजीला मजबुती दिली होती, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबईचे वानखेडेवर वर्चस्व

वानखेडे स्टेडियम (हेड टू हेड) : एकूण १२ सामन्यांपैकी मुंबईने ७ तर चेन्नईने ५ सामने जिंकले आहेत.

एकूण सामने (इतिहास) : ३९ सामन्यांत मुंबई २१-१८ अशा फरकाने आघाडीवर आहे.

ताज्या बातम्या

राज

“देशाच्या राजधानीचे महत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु”; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन राज...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजधानी दिल्लीतून गुजरातमध्ये हलवण्यावरून देशात नवा वाद सुरु झाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून धारेवर धरले आहे. शिवसेना...