Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMPSC: मोठी बातमी! MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; शासन निर्देश...

MPSC: मोठी बातमी! MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; शासन निर्देश जारी

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती अखेर संपुष्टात आणण्यात आली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबतचा शासन आदेश समोर आला. हरपाळकर यांनी MPSC सचिवपदाचा कार्यभार अध्यक्षांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे तातडीने सोपवावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत.

ही कारवाई MPSCच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील विविध त्रुटींविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची एमपीएससीच्या विध्यार्थीं शिष्टमंडळासोबत चर्चा झाली होती. 2 ऑक्टोबरच्या पुण्यातील एमपीससीच्या विद्यार्थीं आंदोलनापूर्वी ही सकारत्मक चर्चा झाली होती. एमपीएससी आंदोलन मागण्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत. एमपीएससीचे सचिव महेंद्र होरपाळकर यांची बदली होणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी एमपीएससी आयोगाचे अध्यक्षांचा राजीनामा होती. मात्र अध्यक्षांचा राजीनामा घेता येणार नाही मात्र सचिवांच्या बदलीचे आश्वासन देण्यात आले होते.

- Advertisement -

काय आहे शासन निर्णय?
महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदावर दोन वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता प्रशासकीय कारणास्तव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, यांची सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदावरील प्रतिनियुक्ती या आदेशानुसार संपुष्टात आणण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे तात्काळ सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहे.

भारताचा अनुभवी फिरकीपटु युझवेंद्र चहलचली निवृत्ती, पोस्टमध्ये म्हणाला, खंत असली तरी…

दरम्यान, पुण्यात गुरुवारपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा होत आहेत. आमदार रोहित पवार हेदेखील आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. गुरुवारी रात्री आमदार रवींद्र धंगेकर यांनीही विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली. आता यापुढे विद्यार्थ्यांची भूमिका नेमकी काय असेल, हे काही वेळाने स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

Ganesh Gite : शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार; नाशिक बाजार...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Nashik Agricultural Produce Market Committee) प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यास...