नवी दिल्ली | New Delhi
आयपीएल (IPL) स्पर्धेतील १९ व्या पर्वाला शनिवार (दि. २८) पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेत एकूण ६५ दिवस ७४ सामन्यांचा थरार रंगणार आहे. एकूण १० संघांमध्ये साखळी फेरीत ७० तर प्लेऑफमध्ये ४ सामने होणार आहेत. या पर्वातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Royal Challengers Bangalore and Sunrisers Hyderabad) आमनेसामने भिडणार आहेत. आरसीबीने गेल्या मोसमात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात १८ वर्षांची प्रतीक्षा संपवत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे यंदा आरसीबी तोच झंझावात कायम राखत विजयी सलामी देणार की सनरायजर्स हैदराबाद सामना जिंकणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल. तर ७ वाजता टॉस होईल, हा सामना स्टार स्पोट्र्स नेटवर्कवरील चॅनेल्सबर पाहायला मिळेल. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात (History) दोन्ही संघांची शनिवारी २८ मार्च रोजी आमनेसामने येण्याची ही २६ वी वेळ ठरणार आहे. सनरायजर्स हैदराबादने २५ पैकी सर्वाधिक १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबीने ११ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता १९ व्या मोसमात कोणता संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळापत्रकासह १९व्या हंगामाचे संपूर्ण शेड्यूल जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी २८ मार्च ते १२ एप्रिल दरम्यानचे सामने घोषित करण्यात आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आधीच मुंबई इंडियन्सच्या पहिल्या चार सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात २९ मार्च रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध बानखेडे स्टेडियम येथे करणार आहे. तर लीग टप्प्यातील अखेरचा सामना २४ मे २०२६ रोजी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सकडून यंदाही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. २९ मार्च ते २४ मे दरम्यान मुंबईची ‘पलटन’ कोणत्या संघाविरुद्ध, कधी आणि कुठे भिडणार, याचा संपूर्ण माहिती समोर आली आहे. मुंचई इंडियन्सच्या संघात हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉचिन मिन्झ, राज बावा, रघू शर्मा, मिशेल सेंटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जैक, शेरफेन रदरफ ोर्ड, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, किंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत यांचा समावेश असणार आहे.
पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड आऊट
दरम्यान सनरायजर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पेंट कमिन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मॅचविनर गोलंदाज जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १९ व्या मोसमातील पहिल्या सामन्याला मुकावे लागले आहे. दोघांनाही काही महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यापासून दूर रहावे लागले आहे.
समालोचकांची यादी जाहीर
आयपीएल स्पर्धेच्या पूर्वसंध्येला समालोचकांची यादी जियो हॉटस्टारतर्फे जाहीर करण्यात आली असून १५० समालोचकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंग्रजी समालोचक एबी डिव्हिलियर्स, रवी शास्त्री, डेल स्टेन, फाफ डू प्लेसिस, ईयान बिशप, हर्षा भोगले
हिंदी समालोचन : आर. अश्विन, सुरेश रैना, अनिल कुंबळे, पीयूष चावला, विरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्ध
मराठी समालोचन : धवल कुलकर्णी, किरण मोरे, सलिल अंकोला, प्रसाद क्षीरसागर, आदित्य तारे, प्रवीण तांबे, प्रसन्न संत




