अहमदाबाद | Ahmedabad
आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज (बुधवारी) अफगाणिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa beat Afghanistan ) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर पहिला सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने दुसर्या सुपर ओव्हरमध्ये (Super Over) अफगाणिस्तान विरूद्ध चार धावांनी विजय मिळवला आणि स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन केला. तसेच अफगाणिस्तान विरूद्ध चौथा विजय संपादन केला. दुसर्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण अफ्रिका संघाने अफगाणिस्तानला विजयासाठी २४ धावांचे आव्हान दिले होते.
दुसर्या सुपर ओव्हरमध्ये दुसर्या चेंडूवर मोहम्मद नबी शून्यावर बाद झाला. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रेहमनुलला गुरबाझने सलग ३ चेंडूंवर ३ षटकार खेचले पण अफगाणिस्तानला विजय (Won) मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिका संघाकडून डेव्हिड मिलर, आणि ट्रिस्टन स्टबजने ३ षटकार खेचून दक्षिण आफ्रिकेला २३ पर्यंत मजल मारुन दिली. अफगाणिस्तान संघाने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला (South Africa) विजयासाठी दिलेल्या १७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला १७ पर्यंत मजल मारता आली.
अखेरच्या चेंडूवर ट्रिस्टन स्टबजने षटकार खेचून सामना बरोबरीत सोडवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या १८७ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाला १८७ पर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानला विजयासाठी ३ चेंडूत २ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर फजल हक फारूकी धावबाद होऊन माघारी परतला आणि सामना टाय झाला. अफगाणिस्तान संघाकडून रेहमनुलला गुरबाझ ८४, रशीद खान २० इब्राहिम झरदान २२ धावांचे योगदान दिले. तर दक्षिण आफ्रिका संघाकडून लुंगी इंगिडीने ३, कगिसो रबाडा, मार्को यानसेन, जॉर्ज लिंडेने १-१ गडी बाद केला.
दरम्यान, तत्पूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक (Tos) गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८७ धावा केल्या. रायन रिकलटन ६१ क्विंटन डिंकाॅक ५९, डेव्हिड मिलर २० धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तान संघाकडून अझमतुलला ओमरझाईने ३ रशीद खान २ आणि फजल हक फारूकीने १ गडी बाद केला. लुंगी इंगिडी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.





