Wednesday, January 28, 2026
Homeक्रीडाIndia Squad vs West Indies: विंडीजविरुध्दच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; शुभमन...

India Squad vs West Indies: विंडीजविरुध्दच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर; शुभमन गिल कर्णधार, तर या तिघांना दिला डच्चू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. २ ऑक्टोबरपासून भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावरील कसोटी मालिका सुरू होणार आहे. यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयची वरिष्ठ निवड समिती २५ सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळेल. स्कॉडमध्ये मोठा बदल केला गेला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन टेस्ट मॅचच्या सीरीजला २ ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होईल. दुसरी टेस्ट मॅच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये १० ऑक्टोंबरपासून होईल. वेस्ट इंडिजचे कोच डॅरन सॅमी यांनी सीरीज सुरु होण्याआधीच टीम इंडियाला इशाऱ्या, इशाऱ्यात आव्हान दिले आहे. जर, न्यूझीलंडची टीम भारताला त्यांच्याच देशात हरवू शकते, तर आम्ही सुद्धा तसच करु शकतो.

- Advertisement -

दरम्यान, शुभमन गिल कर्णधार झाल्यानंतर घरच्या मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. तर रवींद्र जाडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. सरफराज खानला टीममध्ये स्थान मिळालेले नाही. देवदत्त पडिक्कलने टीम इंडियात पुनरागमन केले आहे. तर करुण नायर, साई सुदर्शन, आकाशदीप यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. करुण नायर, साई सुदर्शन इंग्लंड सीरीजमध्ये फ्लॉप ठरले होते. चार कसोटी सामन्यात ते फक्त एक अर्धशतक झळकवू शकले होते विकेटकीपर ऋषभ पंत फिट नसल्याने त्याच्या जागी नारायण जगदीशनचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलने सुद्धा टीममध्ये पुनरागमन केलय.

YouTube video player

बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर मुख्य जबाबदारी असणार आहे. तसेच रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव फिरकीची बाजू सांभाळतील. आम्हाला करुण नायरकडून जास्त अपेक्षा होत्या. फक्त एक डाव खेळता येणार नाही. पडिक्कलला जास्त संधी मिळाल्या नाहीत. आम्हाला सर्वांना 15 ते 20 संधी द्यायची आहेत, पण या परिस्थितीत ते शक्य नाही, असे अजित आगरकरने म्हटले आहे.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ:
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी 8 कोटींची अत्याधुनिक सामग्री

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील बिबट्यांचा वावर व त्यातून होणारा मानवी संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग आता पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे आठ...