Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा-टॅक्सीचीचे वाढले भाडे

सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा-टॅक्सीचीचे वाढले भाडे

मुंबई | Mumbai
एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता जवळ जवळ निश्चित झाले आहे.राज्यात २४ जानेवारीपासून जवळपास १५ टक्क्यांनी एसटी प्रवास महागला आहे. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. परिवहन मंत्र्यांनी ५० टक्के सवलतीबाबत काय म्हटले? ही योजना सुरु राहणार की नाही? याबाबत ही माहिती दिली.

नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत १४.९५ टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली होती. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्याचा भार आता सर्वसामान्यांच्या खिशाला उचलावा लागणार आहे.

- Advertisement -

काय म्हणाले परिवहन मंत्री?
मंत्रालयात नुकतीच प्राधिकरणाची बैठक पार पडली. यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव यांचा या बैठकीत समावेश असतो. काल म्हणजेच २३ जानेवारीला दुपारच्या सुमारात ही बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, तिला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली एसटी दरवाढीबाबत १४.९५ टक्के इतकी वाढ झाली आहे. तर रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ ही एक फेब्रुवारीपासून लागू होणार असून ती ३ रुपयांनी वाढवली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सिएनजी, एसटीचे सुटे पार्ट, इत्यादी गोष्टींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते. मात्र मागील तीन वर्षापासून ही दरवाढ झालेली नाही. परिणामी ही दरवाढ करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

टॅक्सी रिक्षेच्या भाड्यात वाढ
यापूर्वी टॅक्सीचे भाडे २८ रुपये प्रति किलोमीटर इतके होते. आता हे भाडे ३१ रुपये असणार आहे. तर रिक्षाचे भाडे २३ रुपये प्रति किलोमीटर होते, ते आता २६ रुपये इतके होणार आहे. एसटीसह टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीला आज मंजुरी मिळाली आहे. राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...