Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांना कोर्टाचा झटका : दिला असा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांना कोर्टाचा झटका : दिला असा निर्णय

मुंबई :

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना (st strike)कामगार न्यायालयाने (court)चपराक लावली आहे. कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या (work suspenders)कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित नऊ कामगारांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे

- Advertisement -

ही बँक नव्हे, तर आयकर धाडीत सापडलेले कोट्यावधी रुपये

एसटीच्या संपात (st strike)सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर व यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या…

लातूर आणि यवतमाळ विभागातील बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी विरोधात नियोजित कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करण या कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करून, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती.

सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

- Advertisment -

ताज्या बातम्या