शनिवारी संध्याकाळी तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश असल्याचे कळते.या अपघातात ३० हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे कळते . तसेच अनेक कार्यकर्ते बेशुद्ध पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- Advertisement -
अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्षाच्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. विजय यांच्या भाषणादरम्यान गर्दी वाढली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
गर्दीत अडकल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अनेक लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध पडू लागले. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून विजय यांनी आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले.




