Thursday, May 2, 2024
Homeनाशिकविद्यूत तारांचे बेकायदेशीर काम सुरु

विद्यूत तारांचे बेकायदेशीर काम सुरु

पुनदखोरे । वार्ताहर | Punadkhore

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) महावितरणच्या (MSEDCL) देसराणे विभागातील कनिष्ठ अभियंता व स्वयंघोषित ठेकेदाराकडून (contractor) बेकायदेशिर कामे (Illegal works) होत असून ग्राहकांना त्यांच्याकडून आर्थिक भुर्दड सोसावा लागत असल्याची माहीती रवळजी येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक जाधव यांनी दिली आहे.

- Advertisement -

दिपक जाधव यांनी सांगीतले की, महावितरणच्या देसराणे विभागातील देसराणे, रवळजी, मोकभणगी, बरडपाडा आदी गांवामध्ये आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन फसवणुक (Fraud) केली जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रकारची मंजुरी अथवा परवानगी न घेता बेकायदेशिरपणे तसेच निकृष्ठ दर्जाचे साहीत्य वापरून ग्राहकांचे कामे केली जात आहे.

ककाणे (kokane) येथील एका शेतकर्‍याच्या (farmers) शेतीपंपाला (Agricultural pumps) केबल टाकण्याऐवजी तार टाकून दिली असल्याचे समजले आहे. बरडपाडा येथे एका आदिवासी बांधवाचे (tribal community) घरगुती विजबिल (Household electricity bill) थकल्याने त्या शेतकर्‍याचे मिटर बंद करण्याऐवजी चक्क तार काढून रवळजी येथील एका शेतकर्‍याच्या थ्री पेज पोलांना टाकली आहे. मोकभणगी, पिंपळे, येथील थ्री पेज लाईन टाकून देण्यासाठी मोठया प्रमाणात अर्थपुर्ण, व्यवहार करून त्यांची कामे अद्यापही अपुर्णच असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना रोहित्र बसविण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार (Financial transactions) झाल्याची चर्चा परिसरात होत आहे. शासकीय योजनेतून रोहीत्रचे जे कामे होतात. त्या रोहित्रसाठी लागणारे साहित्यांचे वाहतूक नियमानुसार (Traffic rules) ठेकेदाराने करावयाची असते. पंरतू ठेकेदार व अधिकारी संगनमत करून शेतकर्‍यांना स्वखर्चाने वाहतूक करण्यास भाग पाडतात.

या साहीत्य वाहतुकीमध्ये शेतकर्‍यांच्या हातापायाला लागुन मोठी ईजा सुध्दा होते. यात महावितरणचे अधिकारी बघ्याची भुमिका घेतात. संबधित ठेकेदार (contractor) ज्या ऐजन्सीचे काम करतो त्या ऐजन्सीची चौकशी करून बेकायदेशिर कामे करणार्‍यांवर गुन्हे का दाखल होत नाही हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. देसराणे कक्षातील अधिकारी व स्वयंघोषित ठेकेदार कामांसाठी वरिष्ठ विभागाकडून कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता परस्पर कामे करतात.

देसराणे येथील मजुर ठेकेदार बाबुलाल खैरणार यास महावितरणचे कोणतेही प्रकारचे कामे करण्याची परवानगी दिलेली नाही. तो परस्पर कामे करीत आहे . त्याने जे ही कामे केली आहेत त्या कामांची चौकशी करुन वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविण्यात येईल. या प्रकरणात माझा कोणताही संबध नाही.

– किरण टिळे, कनिष्ठ अभियंता देसराणे कक्ष

संबधित प्रकाराबाबत मला काहीही माहीती नसुन कार्यकारी उपअभियंता नितीन अंबाडकर यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा करून चौकशी करण्याचे आदेश देतो.

– रामराव राठोड, कार्यकारी अभियंता, कळवण

- Advertisment -

ताज्या बातम्या