Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदहावीच्या पुरवणी परीक्षेस मराठी पेपरने प्रारंभ

दहावीच्या पुरवणी परीक्षेस मराठी पेपरने प्रारंभ

नाशिक | Nashik
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस प्रथम भाषा मराठीच्या पेपरने प्रारंभ झाला.

जिल्ह्यातून १३ केंद्रांवर बारावीतील कला शाखेचे २ हजार २२३ विज्ञानचे ५५५, वाणिज्यचे ७११ व एमसीव्हीसीचे ३७५ असे एकूण ३ हजार ८६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर १ हजार ८४२ दहावीच्या विद्यार्थ्यांनी १५ केंद्रांवर पुरवणी परीक्षा दिली.

- Advertisement -

बारावीच्या पुरवणी परीक्षा नियंत्रणासाठी १३ केंद्र संचालक व १२ परीरक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, दहावीच्या परीक्षेसाठी १५ केंद्रसंचालकांसह दहा परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा ओळखपत्र, मास्क, पाण्याची बाटली, लेखन साहित्य परीक्षा कक्षात ज देण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर व थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती

- Advertisment -

ताज्या बातम्या