Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक-पुणे महामार्गावर बसला आग

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग

बस चालकाचे प्रसंगावधान; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

सोलापूरहून नाशिककडे येणाऱ्या राज्य महामंडळाच्या बसला नाशिक- पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्याजवळ अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली,दरम्यान बस चालकाने प्रसंग ओळखत बस थांबवल्याने प्रवासी सुखरूप बचावले.

- Advertisement -

दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढलेली असताना ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे एकच पळापळ झाली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दि,13 रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान सोलापूर मार्गे नाशिककडे येणारी महामंडळाची हिरकणी बस एम,एच,06 बी डब्ल्यू 1235 ही प्रवाशांना घेऊन येत असताना नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्यावर बस समोरील भागातून धूर निघत असताना वाहनचालक विलास रोकोचोले वाहक संदीप मोरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ टोलनाक्याचापुढे बस थांबवत बसधील एकूण 17 प्रवाशांना बस खाली उतरवले.

दरम्यान काही क्षणातच बसने पेट घेतला उपस्थित नागरिकांनी प्रथम आग विझवण्याचा प्रयत्न केला,यावेळी भिकू पोरजे यांनी तत्काळ नाशिकरोड अग्निशामक विभागाला कळविले असता त्यांनी धाव घेत आग विझविली अग्निशामक पथकाचे प्रभारी केंद्रप्रमुख राजेंद्र सोनवणे,वाहन चालक लक्ष्मीकांत बेंद्रे,फायरमन रामदास काळे,यश बिडवे,हरिओम खालकर,तेजस जाचक आदी उपस्थित होते,

या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी बसमधील कोणत्याही प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना दुखापत झालेली नाही,या घटनेमुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...