Sunday, May 5, 2024
HomeजळगावPhotos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : वेडात म्हातारे वेगाने दौडले तीन...

Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : वेडात म्हातारे वेगाने दौडले तीन : सकारात्मक, संदेशग्राही नाट्यानुभव!

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 61 व्या राज्य नाट्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2022-23 अंतर्गत जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीचा समारोप आज होतो आहे. रात्री छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर झालेले प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगायला शिकले पाहिजे असा रचनात्मक संदेश नाटक म्हणजे ‘वेडात म्हातारे वेगात दौडले तीन’ हे नाटक होय.

प्रस्तृत नाट्यप्रयोग भुसावळच्या औष्णिक विद्युत केंद्राने सादर केला होता. संवेदनशील लेखक प्रकाश गावडे लिखित आणि मेहनती रंगकर्मी नितीन देवरे दिग्दर्शित या दोन अंकी नाटकाने आपले आयुष्य म्हणजे उन सावलीचा खेळचं आहे सुख दुःख येतील जातील प्रसंगी पोटच्या मुलींच्या स्वार्थापायी नात्यांचा खून होवून त्यांच्या विरहाने जीवघेणे एकाकीपण देखील जाणवेल. पण म्हणून निराश नी हताश होवून आत्महत्या करु नका.

- Advertisement -

मरणाला कवटाळू नका तर प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची उर्मी कायम ठेवत जगा कारण जगणे सुंदर आहे. असा सकारात्मक संदेश दिला आणि अखेरच्या टप्प्यात संहितेतील काहीसा ठिसूळपणा, काहींचा अभिनयातील एकसुरीपणा वगळता नाटय रसिकांना एक संदेशग्राही नाट्यानुभव दिला हे अगदी निर्विवाद!

या नाट्य प्रयोगात प्रारंभी परिस्थिती आणि मुलांच्या बायकोच्या विरहामुळे एकाकी झालेले आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे हताश आणि हतबल झालेले तीन म्हातारे जोशी (मोहित कांबळे), जावडेकर (शुभम गुडा), पवार (किरण चाटे) हे कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र भोवतालच्या काही सकारात्मक प्रसंगामुळे, घटनांमुळे त्यांचे मत आणि मन परिवर्तन होते आणि ते पुनश्च हरी ओम म्हणत नव्या सर्वांनाच अनेक प्रकारची दुःखे आहेत तेव्हा आशावादी मनाची काठी घेवून नव्याने उभे राहून सकारात्मक विचार मनात ठेवावा आणि आपले आयुष्य नव्याने सुंदरपणे जगावे असा संदेश देत तीन म्हातार्‍यांच्या जीवन कहाणीचा सुखांन्त होतो.

उद्याचे नाटक पुन्हा सलवा जुडूम अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या