Saturday, September 14, 2024
Homeनाशिकनाशिक : राज्य उत्पादन शुल्कमध्ये ४०० कोटींची घट; करोना, दारूबंदीचा फटका

नाशिक : राज्य उत्पादन शुल्कमध्ये ४०० कोटींची घट; करोना, दारूबंदीचा फटका

नाशिक : प्रतिनिधी

कोरोना या जिवघेण्या आजाराच्या परिणामी सलग दहा दिवसांपासून बंद करण्यात आलेल्या दारूबंदीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागास तब्बल ४०० कोटींचा फटका बसला आहे. ऐन मार्च अखेर वसुलीच्या कालावधीत ही बंदी आल्याने हा फटका बसल्याचे अधिकर्‍यांनी सांगितले. घटलेल्या महासुलामुळे या विभागास आपले उदिष्ट गाठता येणार नाही.

- Advertisement -

नाशिक जिह्यात सुमारे एक हजाराहून अधिक परवानाधारक विक्रेते तसेच देशी विदेशी मद्यनिर्मीतीचे कारखाने आहेत. या जिह्यातील दारू राज्यासह केंद्र शासित आणि विदेशात देखील पुरवठा केली जाते. तर सर्वाधिक वाईनरींची संख्याही याच जिह्यात असल्याने मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला जातो.

मद्यविक्रीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यांवधीचा महसूल जमा करीत कायम अव्वल नाशिक जिह्यात सुमारे एक हजाराहून अधिक परवानाधारक विक्रेते तसेच देशी विदेशी मद्यनिर्मीतीचे कारखाने आहेत. या जिह्यातील दारू राज्यासह केंद्र शासित आणि विदेशात देखील पुरवठा केली जाते.

तर सर्वाधिक वाईनरींची संख्याही याच जिह्यात असल्याने मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला जातो. जाणार्‍या नाशिक जिह्याने राज्याच्या महसूलात आपले स्थान कायम अव्वल राखले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून महसूलात अव्वल राहण्याची परंपरा कायम राखणार्‍या या विभागास उद्दीष्ट गाठण्यास मात्र यंदा घरघर लागली आहे.

संसर्गजन्य असलेला हा आजार टाळण्यासाठी शासनस्तरावरून राज्यभरात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. देशी विदेशी दारू दुकानांसह परमिटरूम मध्ये होणारी गर्दी लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा परिणाम एक्साईज विभागाच्या उद्दीष्टावर झाला आहे.

कारखान्यांकडील मद्यनिर्मीतीचा महसूल दरमहा जमा होत असला तरी देशी विदेशी दारू परवाना धारकाचे नुतनीकरण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होत असल्याने हा फटका सहन करावा लागणार आहे. कोरोना मुळे कार्यालयीन संख्या आटोक्यात आणली असली तरी हा विभाग दारूबंदीमुळे पुरता कामाला लागला आहे. अवैध दारू विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी शहरासह जिल्हाभरात नाकाबंदी तसेच छापासत्र या विभागाकडून राबविले जात आहे. एकुणच याचा परिणाम महसूल वसूलीवर झाला आहे.

३ हजार ४०० कोटिंचे उदिष्ट

नाशिक जिल्हा महसूलात अव्वल राहतो. यंदा या विभागास ३ हजार ४०० कोटी रूपयांचे वसूलीचे उद्दीष्टे असून मार्च ते डिसेंबर २०१९ या काळात एक्साईज विभागाने तीन हजार कोटी रूपये वसूली केली आहे. मात्र यंदा कोरोना या जिवघेण्या आजाराने तोंड वर काढल्याने उर्वरीत ४०० कोटी रूपयांचे उद्दीष्टे गाठणे या विभागास कठीण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या