Wednesday, November 13, 2024
Homeराजकीयमी असे काहीही बोललोच नाही

मी असे काहीही बोललोच नाही

पुणे(प्रतिनिधी)

काही आयपीएस अधिकार्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विलीच हाणून पाडला अशा प्रकारचे वक्तव्य मी केलेलं नाही. छापून आलेले वक्तव्य निराधार असून माझ्या तोंडी वक्तव्य टाकण्यात आले आहे. या संबंधातील माझी व्हिडीओ क्लिप बघितल्यानंतर सर्व गोष्टी लक्षात येतील असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघात सदिच्छा भेटीसाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

एका वृत्तपत्रामध्ये काही आयपीएस अधिकार्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवेळीच हाणून पाडला असा गौप्य स्फोट केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. सर्व पोलिस अधिकारी हे पोलिस खात्याच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. सर्वजन चांगले काम करीत आहेत असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने १२,५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून हे प्रक्रिया सुरु आहे. भरतीची प्रक्रिया मोठी आहे. शारीरिक परीक्षा, लेखी, तोंडी परीक्षा याला मोठा कालावधी लागणार आहे. या भरतीसाठी २५-३० लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवून भारती करणार

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी पोलीस भरती करताना मराठा समाजासाठी १३ ताक्के जागा राखीव ठेऊन ही भारती करण्यात येईल. त्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय घेऊ. परंतु, कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या साडेचार महिन्यांपासून डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार असे सर्वच घटक आणि मुख्यत: पोलीससही काम करीत आहेत. या काळात संक्रमित झालेले २०८ पोलीस मृत्युमुखी पडले.

पोलीस संक्रमित झाले तर त्यांना चांगले उपचार व्हावेत यासाठी त्या त्या ठिकाणी चांगले उपचारासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी व्यवस्था केली आहे. करोना योद्धा म्हणून ६५ लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले आहेत. तसेच जे पोलीस करोन काळात शहिद झाले आहेत. त्यांना शासकीय निवस्थानात राहू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवृत्त झाले तरी त्यांना निवास्थान सोडू नये, असाही निर्णय घेतल्याचे त्यांनी संगितले.

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. वाधवान प्रकरणात गुप्ता यांच्यावर बरेच आरोप झाले होते. याबाबत विचरले असता देशमुख म्हणाले, गुप्ता यांनी करोना काळात मुख्य सचिव होते. त्यांच्या हातून चूक झाली त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यांची चूक झाली ती त्यांनी मान्य केली आहे. त्यांना शिक्षाही झाली आहे. मात्र, ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत असे ते म्हणाले. त्यांना काय शिक्षा झाली याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या