Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपरिवहन मंत्री अनिल परब करोना संक्रमित

परिवहन मंत्री अनिल परब करोना संक्रमित

मुंबई –

परिवहन मंत्री अनिल परब यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून

- Advertisement -

त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीला अनिल परब हजर होते. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनजंय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ आता परिवहन मंत्री अनिल परब यांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या