Friday, May 3, 2024
Homeराजकीय२ ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी समर्थन व संपुर्ण स्वातंत्र्य आंदोलन

२ ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी समर्थन व संपुर्ण स्वातंत्र्य आंदोलन

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

केंद्र शासनाने संमत केलेल्या विधेयकांच्या समर्थनार्थ तसेच विधेयकातील त्रुटी सुधारून शेतकर्‍यांना संपुर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेना २ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी समर्थन व संपुर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांना शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार शेतकर्‍यांसाठी बाजार पेठ खुली होत आहे हे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे. शेतकर्‍यांना शेतीमाल व्यापाराचे स्वातंत्र्य सरकार देत आहे मात्र आवश्यक वस्तू कायद्यातून वगळलेल्या वस्तू, भाव वाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या विधेयाकातील तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. या तरतुदीमुळे शेतीमाल व्यापारावर अनिश्चिततेची टांगती तलवार राहणार आहे. या तरतुदीमुळे शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार व गुंतवणुकदार सर्वांचाच तोटा आहे. कायदा तयार करताना सरकारने ही दुरुस्ती करावी अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

सरकार योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. याचे समर्थन करतानाच शेतकर्‍यांना अर्धवट नको, संपुर्ण स्वातंत्र्य पाहिजे यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहे. सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधण्यासाठी व विधेयका विषयी चिंतन करण्यासाठी २ आॉक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या दिवशी शतेकर्‍यांनी म. गांधी किंवा लाल बहादुर शास्त्री यांच्या पुतुळया समोर सकाळी ११ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत चिंतन, प्रबोधन करावे व त्या नंतर मोर्चाने जाऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात येइल. शेतकर्‍यांनी बहुसंख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या