Thursday, May 2, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांच्या कर्जाविषयी कृषी मंत्र्यांना साकडे

शेतकर्‍यांच्या कर्जाविषयी कृषी मंत्र्यांना साकडे

शिरवाडे वाकद । वार्ताहर Shirvade

जिल्हा बँकेच्या ( District Bank ) कर्जदार सभासदांच्या समस्या सोडविण्याची मागणी शेतकर्‍यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांना निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या कर्जदारांनी सामोपचार योजनेअंतर्गत कर्ज भरूनही अद्याप त्यांना नवीन कर्ज अथवा ना हरकत दाखले मिळाले नाही. ज्या कर्जदारांच्या जिल्हा बँकेत ठेवी आहेत त्या कर्जखाती वर्ग करण्यात याव्या. समोपचार योजनेत सन 2016 नंतरच्या कर्जदारांचाही सहभाग घ्यावा. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असूनही दुसर्‍या बँकेतील खाते सील करत लाभार्थ्यांकडून जिल्हा बँकेने सर्रास अवैध कर्ज वसुली सुरू केली आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला असून सरकारने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सन 2002 ते 2015 या कालावधीतील दीड लाखापर्यंत कर्ज माफ केले. सन 2016-17 ला जिल्हा बँकेने वाढीव कर्ज दिल्याने बहुतांशी शेतकर्‍यांनी आर्थिक टंचाईशी झगडत जुने कर्ज भरून नवीन कर्ज उचलले. मात्र सन 2016-17 मध्ये पीक कर्ज उचल केलेले शेतकरी चालू कर्जदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीपासून वंचित राहिले.कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यात शेतकर्‍यांची जिल्हा बँकेकडून कर्जमाफीस पात्र असतांनाही जोरदार कर्जवसुली सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

वसुलीसाठी जिल्हा बँकेने दोनदा नोटिसा बजावल्या आहेत. तर काही शेतकर्‍यांचे दुसर्‍या बँकेतील खाते ही सील केले आहेत. जे शेतकरी दोन लाखावरील कर्जाची रक्कम अदा करण्यास तयार आहेत त्यांच्यासाठी कुठलीही हालचाल नाही. बँकेने सरसकट कर्ज वसुली सुरू केली असल्याने पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे दोन लाखावरील कर्ज वसुली करून दोन लाख रुपयांची सरकारने हमी घ्यावी अशी मागणी बाळासाहेब कुलकर्णी, रमेश बडवर, साहेबराव पाटील, संंदीप पाटील यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या