Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य प्राथमिक शिक्षक संघाचा राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा

राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये एकुणच शिक्षणाची बोंबाबोंब सुरु आहे. राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा खालावत चालल्याचा या आधीही आरोप करण्यात आला होता. अशैक्षणिक कामे, खासगीकरणाचे व शाळा बंद करण्याचे धोरण याबद्दल संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांनी एल्गार पुकारला असून, ‘आम्हाला शिकवू द्या’ हे घोषवाक्य घेऊन राज्य प्राथमिक शिक्षक संघ आज ‘राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा’ काढणार आहे.

सध्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नसल्याने सरकारी शाळा धोक्यात आल्या आहे. शिक्षकांकडून विविध प्रकारची माहिती मागवली जाते आहे. राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, डायट, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या स्तरावरुन शिक्षकांना कागदी घोडे नाचवण्यासाठी सांगितले जात असतात. त्यामुळे शिक्षक मेटाकुटीला आले आहे.

शालार्थ, स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, यु-डायस पोर्टल, बदली पोर्टल, दिक्षा ॲप, एमडीएम ॲप, विनोबा ॲप, उल्हास ॲप, प्रशिक्षणांच्या लिंक अशा रोज माहित्या मागविल्या जात आहेत. शाळा बंद करणे, खासगी करणे या बेकायदेशीर बाबी घडत आहेत. शिक्षण विभाग याबाबत संवादास तयार नसल्याने आज (२ ऑक्टोबर) रोजी स्थानिक पातळीवर आक्रोश आंदोलन करणार आहेत.

सरकारी शाळांमध्ये सीएसआरच्या नावाखाली खासगीकरण होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. सरकारी शाळांना भांडवलदारांची नावे देण्याचा शासन निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. यासोबतच, सतत प्रलंबित असलेले फंड प्रस्ताव, वैद्यकीय बिले, पुरवणी बिले याबाबतच्या लाल फितीच्या कारभारामुळे लागणारा विलंब आक्रोश मोर्चामध्ये उघड करणार

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या