Friday, May 3, 2024
Homeनाशिकदुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा

दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा

सातपूर दि.25 प्रतिनिधी

नासर्डी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून, स्वच्छतेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना विविध साथींच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

नासर्डी नदीच्या परिसरात सातपूर गावात वसाहत असल्याने महादेव वाडी स्वारबाबानगर, मटन मार्केट परिसर या भागात निवासी वसाहतीचा कचरा नदीपात्रात फेकला जात आहे.

त्यामुळे नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. स्वच्छता अभियानात नाशिक शहर जरी पुढे सरकत असले, तरी नासर्डी नदीपात्र मात्र घाणीच्या साम्राज्यात बसलेला आहे. नासर्डी नदीलगत असण्यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नासर्डी नदीतून जात असते.

या पाईप लाईनवर मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा परिसरात होत आहे. अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या परिसरातच तातडीने स्वच्छता करण्यात यावी व लिकेज असलेल्या पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक अनिल मौले,सुनील मौले, राहुल जाधव ,योगेश आहेर ,गोरख भंदुरे, सुनील काळे भोला काळे आदींनी केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या