Thursday, May 15, 2025
Homeनाशिकचोरीस गेलेले दीड लाख रुपये मिळाले परत

चोरीस गेलेले दीड लाख रुपये मिळाले परत

निफाड। प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

निफाड बसस्थानकात गुरुवारी (दि.27) दुपारी 4 ते 5 वाजेदरम्यान चोरीस गेलेले दीड लाख रुपये नागरिकांच्या समयसूचकतेमुळे व पोलिसांच्या प्रयत्नामुळे परत मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर येथील मनोज चुनीलाल शहा यांचे लासलगाव येथून व्यापार्‍यांकडे असलेले 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम घेऊन ते विंचूर येथून (एम.एच.15/2195) सिल्लोड-नाशिक या बसमधून नाशिक येथे जाण्यासाठी चढले. त्यांच्या हातात असलेल्या बॅगेतील बंद पाकीटात असलेले 1 लाख 30 हजार रुपये चोरट्यांनी हातोहात लंपास केले होते. परंतु त्यांच्या ही बाब निफाड बसस्थानकात आल्यानंतर लक्षात आली.

बॅगेची चैनही लावलेली होती. परंतु बॅगेत पैशाचे पाकीट नव्हते. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करत माझे पैसे चोरीला गेल्याचे वाहक व चालकाला सांगितले. हे ऐकून पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव केणे यांनी वाहतूक नियंत्रक कैलास लाड व पोलिसांना फोन करून या चोरीची घटना सांगितली. निफाड बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक कैलास लाड यांनी लगेच एसटी बाजूला लावत प्रवाशांना बाहेर व आत जाण्यासाठी मज्जाव केला. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जवळपास 125 प्रवासी असलेल्या या एसटीत निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सागर सारंगधर व पोलीस नाईक गोविंद खुळे यांनी घटनास्थळी लागलीच धाव घेत चोरलेले पैसे परत देण्याचे आवाहन केले व एसटीतील झडतीसत्र सुरू केले.

संबंधित चोरट्याने आता आपण सापडले जाणार या भीतीपोटी बंद पाकिटात असलेली रक्कम कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने सिटाखाली फेकून दिली. झडतीत पोलिसांना खाली पडलेले पाकीट दिसून आले. चोरट्यांनी सावपणाचा आव आणत आपले बिंग फुटेल यामुळे पैशाचे पाकिट टाकून दिल्याने मनोज शहा यांना दीड लाख परत मिळाले.

सामाजिक कार्यकर्ते वैभव केणे व निफाड बसस्थानक नियंत्रक कैलास लाड यांच्या समयसूचकतेमुळे तर पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे कोल्हापूर येथील व्यापार्‍याचे पैसे सापडल्याने पैसे आले, पण चोर निसटले असे प्रवाशांनी याप्रसंगी सांगितले. कारण दीड ते दोन तास एसटी थांबल्याने बाकी प्रवाशांना मानसिक ताण सहन करावा लागला.

तर या कारवाईत निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सारंगधर व पोलीस नाईक खुळे यांनी लगबग केल्याने पैसे सापडले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर पैसे परत मिळाल्याने मनोज शहा यांना आपल्या भावनांना वाट करून देताना आनंदाश्रू रोखता आले नाही अशा घटना वारंवार निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसस्थानकात घडत असतात.परंतु नागरिकांनी समयसूचकता व पोलिसांनी सहकार्य केले तर चोरांना आळा घालता येवू शकतो हे आजच्या घटनेवरून बसस्थानकात बघायला मिळाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...