Thursday, November 21, 2024
Homeनगर‘वंचित’च्या उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक; गुन्हा दाखल

‘वंचित’च्या उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक; गुन्हा दाखल

राजूर |वार्ताहर| Rajur

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या (Shirdi Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक (Stone Throwing) केल्याची घटना सोमवार दि. 6 मे रोजी रात्री 11.45 ते 12 वाजेच्या सुमारास चितळवेढे घाटात घडली आहे. या घटनेत त्या बालंबाल बचावल्या आहेत.

- Advertisement -

याबाबत राजूर पोलिसांकडून (Rajur Police) मिळालेली अधिक माहिती अशी, की अकोले (Akole) तालुक्यातील प्रचाराचा दौरा आटोपून उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) वाहनातूर संगमनेरकडे (Sangamner) येत होत्या. दरम्यान, राजूर जवळील चितळवेढे घाटातून येत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. या हल्ल्यात रूपवते यांना कुठलीही दुखापत झाली नाही, परंतु वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच राजूरचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच वंचित बहुजन आघाडीचे समर्थकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेल्या या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला. याप्रकरणी रूपवते यांनी राजूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 209/2024 भादंवि कलम 336, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे हे करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या