Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारबारी येथे कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या वाहनांवर दगडफेक

बारी येथे कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या वाहनांवर दगडफेक

नवापूर Navapur। श.प्र.-

तालुक्यातील बारी (Bari) येथे अवैध लाकुड कारखान्यावर (illegal timber factory) कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या वाहनांवर (Forest Department vehicles) ग्रामस्थांनी दगडफेक (Stones hurled) केल्याने एक कर्मचारी जखमी झाला असून शासकीय वाहनांचे नुकसान झाले आहे. या कारवाईदरम्यान, 50 हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

सहाय्यक वनसंरक्षकांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर, चिंचपडा येथील वनक्षेत्रपाल व गस्तीपथकाने बारी ता.नवापूर या गावातील कमलेश बुध्या कोकणी याच्या घराची झडती घेतली. त्यात 3 साग चौपाट, 2 दरवाजे फालके व एक डिझाईन मशीन मिळून आले. सदर मुद्देमाल शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला.

सदर कारवाईदरम्यान बारी गावातील 60-70 महिला व पुरुषांच्या जमावाने एकत्रित येऊन कारवाईत अडथळा निर्माण केला. अचानक एक अज्ञात इसमाने शासकीय (वाहन क्र.एम.एच.39-0319) वर दगडफेक केली. यात वाहनाच्या मागची काच फुटली. व गाडीजवळ उभे असलेले वनरक्षक बिलाल रेहमान शहा यांना हाताला दगड जोरात लागून मुक्का मार लागला. तसेच सदर दगड(विट) व गाडीचे काच त्याच्या हाताला लागल्याने रक्तस्राव सुरू झाला.

सदर परिस्थितीचा अंदाज घेत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांनी सदर जमावाची समज काढत बारी गावातून स्टाफ व जप्त मुद्देमाल नवापूर विक्री आगार येथे आणला. वनपाल वडकळंबी यांनी गुन्हा नोंद केला. जखमी वनरक्षक याच्यावर नवापूर उप जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यात आले. वनविभागाने, नवापूर पोलिस स्टेशन येथे शासकीय वाहनवर दगडफेक, शासकीय कामात अडथळा, वन कर्मचारी याच्यावर दगडफेक, शासकीय मालमत्ता नुकसानीबाबत फिर्याद दाखल केली. सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत 50 हजार रुपये आहे.

कारवाइत धनंजय ग.पवार, वनक्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमल, वनपाल सुनीता पाटील वनरक्षक कल्पेश अहिरे, तुषार नांद्रे, भूपेश तांबोळी, भानुदास वाघ, बिलाल शाह, कमलेश वसावे, किसन वसावे, अरविंद निकम, प्रतिभा पवार, पुनम सोनवणे, नयना हडस, वाहन चालक – एस.एस. तुंगार, चामार्‍या गावित आणि दिलीप गुरव, वनमजूर-यांनी सहभाग भाग घेतला.

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या