Tuesday, December 3, 2024
Homeदेश विदेशभारताचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची चाचणी यशस्वी; 'हे' देश येतात टप्प्यात

भारताचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची चाचणी यशस्वी; ‘हे’ देश येतात टप्प्यात

मुंबई | Mumbai

क्षेपणास्त्र आणि संरक्षण क्षेत्रात भारताने आज आणखी एक महत्त्वाचे यश संपादन केले. इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची चाचणी यशस्वी झाली आले.

- Advertisement -

सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या शक्तिशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी 4 ची चाचणी घेण्यात आली.

अग्नी 4 क्षेपणास्त्राचे एकूण वजन 17000 किलोपर्यंत आहे. त्याची लांबी 20 मीटर आहे. त्यात स्फोटकांच्या रूपात सामरिक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे. ते 900 किमी उंचीपर्यंतदेखील उड्डाण करू शकते.

तसेच त्यात अनेक आधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. यात रिंग लेझर गायरो इनरशियल नेव्हिगेशन सिस्टमदेखील आहे. त्याची मारक क्षमता अचूक आहे.

संपूर्ण पाकिस्तान आणि चीनचा निम्मा भाग या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येऊ शकणार आहे. त्यामुळे अग्नी-4 ची चाचणी हे लष्कराला मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या