Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानारीशक्तीला महाविकास आघाडीचे बळ!

नारीशक्तीला महाविकास आघाडीचे बळ!

सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था Sindhudurga

उपमुख्यमंत्री अजित पवार काल सिंधुदुर्ग दौर्‍यावरDeputy Chief Minister Ajit Pawar on sindhudurga Tour होते. या दौर्‍यात पवार यांच्या कारचे सारथ्य महिला चालकाकडे woman car driver असल्याचे दिसून आले. महाविकास आघाडी सरकारकडून नारीशक्तीला वेगवेगळ्या प्रयत्नांतून बळ दिले जात आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे सारथ्य महिला चालकाकडे सोपवून आघाडी सरकारने त्याचा प्रत्यय दिला.

- Advertisement -

‘ओमायक्रॉन’ संकटाचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केल्या जाणार्‍या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.

मात्र आढावा बैठकीपेक्षा या दौर्‍यादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाहनचालकाबाबत जास्त चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौर्‍यावेळी त्यांच्या वाहनाचे सारथ्य पोलीस दलातील तृप्ती मुळीक या महिला चालकाने केले. त्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर झळकली आहेत. त्यात तृप्ती मुळीक वाहन चालवत आहेत. कारमध्ये उपमुख्यमंत्री पवार, तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री सतेज पाटील दिसत आहेत.

नव्या जबाबदारीचा पहिला दिवस

राज्यमंत्री पाटील यांनी ते छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करून मुळीक यांचे कौतुक केले. नारी शक्ती! कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक Police Constable Trupti Mulik यांनी नुकताच व्हीआयपी सिक्युरिटी ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण पूर्ण करून आज सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर उपमुख्यमंत्री पवार, उदय सामंत आणि मी बसलेल्या वाहनाचे सारथ्य केले. गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात त्या सेवा देत आहेत. लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागात कार्यरत आहेत. व्हीआयपी वाहन चालवण्याच्या नव्या जबाबदारीचा त्यांचा आज पहिलाच दिवस होता, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या