Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक रोड : प्लास्टिक वापराबाबत कठोर कारवाई

नाशिक रोड : प्लास्टिक वापराबाबत कठोर कारवाई

नाशिकरोड । Nashikroad (प्रतिनिधी)

प्लॅस्टिक बंदी असतानासुद्धा दुकानात प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी जेलरोड येथील साई प्लास्टिक या दुकानदाराला महापालिकेच्या पथकाने 25 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

- Advertisement -

या पूर्वीसुद्धा या दुकानाला आठ महिन्यापूर्वी पाच हजार रुपये व दुसर्‍यांदा दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. असे असताना सुद्धा पुन्हा सदर दुकान चालकाने प्लास्टिक वस्तू व पिशव्या दुकानात ठेवल्याने महापालिकेने पंचवीस हजार रुपयेचा दंड ठोठावला आहे.

त्याच प्रमाणे जेलरोड परिसरात असलेल्या रॉयल बेकरी या ठिकाणी व त्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने बेकरी चालकाला सुद्धा दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

सदरची कारवाई मनपा विभागीय अधिकारी दिलीप मेनकर, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, ज्ञानेश्वर भोसले, विजय मोरे, राजू निरभवणे आदींनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या