Sunday, September 15, 2024
Homeनाशिकसुरगाणा तालुक्यात सलग तीन दिवसांपासून कडकडीत बंद

सुरगाणा तालुक्यात सलग तीन दिवसांपासून कडकडीत बंद

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

- Advertisement -

संवर्ग पेसा भरती मागणी करीता सकल आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने २१ ऑगस्ट पासून आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने चक्का जाम आंदोलन छेडले असून सुरगाणा शहरा सह उंबरठाण, बोरगाव, बा-हे, मनखेड, पळसन, पांगारणे या ठिकाणच्या बाजार पेठ ठप्प झाली आहे. शहरातील आरोग्य सेवा वगळता तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, बॅंका, पोस्ट ऑफिस, सायबर कॅफे आदी सर्व प्रकारच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.

नाशिक सुरत महामार्ग घागबारी उंबरपाडा येथे चक्का जाम आंदोलन सुरु असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. लांबच लांब रांगा लागल्या आहेत.गुजरात राज्यातील बससेवा सापुतारा पर्यंत उपलब्ध असून नाशिक कडे जाणारा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पुर्णपणे विस्कळीत झाली आहे.आज सुरगाणा शहरात शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते, किरकोळ दुकानदार, टपरी चालक आदी व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

सुरगाणा येथे दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता आंदोलक सामाजिक, राजकीय, आदिवासी संघटना,लोकप्रतिनीधी सहभागी होत आपला पाठिंबा दिला आहे. वणी, बा-हे,उंबरठाण भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते.आंदोलक रस्त्यावर दिवसभर ठाण मांडून बसले होते. या वेळी भिका राठोड, वसंत बागुल, हिरामण गावित, चंदर वाघमारे, परशुराम गावित, कासम वळवी,गोपाळ सितोडे आदी उपस्थित होते.

सुरगाणा येथील मुस्लिम पंचकमिटी यांनी चक्का जाम आदोलनाला पाठिंबा दिला आहे , आज जुम्माची नमाज पठण झाल्या नंतर सर्व मुस्लिम समाज बांधव वीर बिडसा मुडा चौक येथे पाठिंबा देण्यासाठी जमले होते . यावेळी हिरामण गावित ,नगराध्यक्ष भरत वाघमारे , भास्कर जाधव, भास्कर धुम, वसंत बागुल , चितामण गवळी, परसराम गावित, संरपंच संदु बागुल, मौलाना अब्बु शेख, समिर शेख ,ईजाज शेख, जावेद शेख, जाविद काजी, ईम्रान शाहा, अन्नवर शाहा, शकील पठाण, ईनुस पठाण, अफराज पठाण, समद शेख, आझाद शेख, शारूख मणियार, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनाने सर्वच वाहतूक, दळणवळण, शिक्षण, व्यवसाय ठप्प झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या