Friday, May 3, 2024
HomeजळगावPhoto # संप,आंदोलन,निदर्शनांनी आठवड्याची सुरुवात

Photo # संप,आंदोलन,निदर्शनांनी आठवड्याची सुरुवात

जळगाव । jalgaon

केंद्र सरकारच्या (Central Government) खाजगीकरण धोरणाला (Privatization policy) विरोध (Protest) करण्यासाठी महावितरण (MSEDCL) व बँक कर्मचार्‍यांनी (bank employees) दोन दिवसीय देशव्यापी संप (strike) पुकारला. तसेच महसूल कर्मचार्‍यांनीही (revenue staff) प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली. तर सीटू, इंटक, आयटक संघटनेतर्फेही (Organization) कामागार विरोधी धोरणांच्या (Anti-worker policies) निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. एकूणच संप, आंदोलन, निदर्शनांनी मार्च एंडच्या आठवड्याची सुरूवात झाली.

- Advertisement -

महावितरणचे 4500 कर्मचारी संपात सहभागी

देशांतील संपूर्ण वीज उद्योगाचे खाजगीकरण (Privatization of power industry) करण्याच्या दृष्ट हेतूने केन्द्र शासनाने (Central Government) एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत (संशोधन) बील 2021 मागे घ्यावे, राज्यातील 6 जलविद्युत केन्द्राचे खाजगीकरण रद्द करावे, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय मागे घ्यावा, 30 हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीचे सरंक्षण द्यावे, 40 टक्के पेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागांवर कर्मचारी सरळ सेवा भरती करावी, या मागण्यासाठी सर्कल कार्यालयासमोर वीज कर्मचार्‍यांनी (power employees) धरणे आंदोलन (agitations)केले. या आंदोलनात जळगाव परिमंडळातील तब्बल 4500 कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा कॉ. वीरेंद्रसिंग पाटील यांनी केला.

ऊर्जा मंत्र्यांनी (Minister of Energy) उद्या मंगळवारी दुपारी प्रत्यक्ष बैठक घेवून या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. असे सांगितले आहे. तरी, वीज कर्मचार्‍यांनी संप मागे घेवून कामावर परतावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान जोपर्यंत शासन मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप कायम ठेवला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या (Privatization) धोरणाविरोधात सीटू, इंटक, आयटक संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह कामगारांनी (workers) महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कॉ. विजय पवार, कॉ. अमृत महाजन यांनी कामगारांना मार्गदर्शन करीत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.

महसूल कर्मचार्‍यांची निदर्शने

लाक्षणिक संपात जिल्हाभरातील सर्व महसूल कर्मचारी (Revenue staff) सहभागी झालेले होते. आंदोलनाच्या अनुषंगाने सर्व महसूल कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) तसेच तालुका स्तरावर तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयांसमोर निदर्शने करुन घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे योगेश नन्नवरे, रविंद्र उगले, अतुल जोशी, संदीप गवई, गणेश हटकर, योगेश पाटील, नूर शेख, सुरेश महाले तसेच महिला प्रतिनिधी प्रिया देवळे, रेखा चंदनकर, अनिता पाटील, सुनंदा पाटील, रेखा कुलकर्णी तसेच महसूल कर्मचारी संघटना तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रेड बँकांचे व्यवहार ठप्प

ऑल इंडिया बँक एम्लॉईज असोसिएशनतर्फेही (All India Bank Employees Association) केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसीय संपाची (Strikes) हाक देण्यात आली आहे. कामगार कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द करणे, कोणत्याही स्वरूपाचे खासगीकरण न करणे, राष्ट्रीय चलनीकरण वाहिनी रद्द करणे, कंत्राटी कामगारांचे नियमितीकरण, जुनी पेन्शन योजना लागू करणे, बँकांना बळकट करणे यासह विविध मागण्यांसाठी ट्रेड बँकांनी आज संप पुकारला.

उद्या दि. 29 पर्यंत हा संप (Strikes) कायम राहणार असल्याने पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया या बँका बंद राहणार आहेत. दरम्यान बँक असोसिएशनने पुकारलेल्या संपात केवळ 20 टक्केच कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे दैनंदीन व्यवहारावर फारसा परिणाम झाला नसल्याचे अग्रणी बँकेचे अध्यक्ष अरूण प्रकाश यांनी सांगितले.

ब्राह्मण महाशिखर परिषदेचे धरणे

ब्राह्मण समाजासाठी (Brahmin society) आर्थिक विकास महामंडळाची (Economic Development Corporation) स्थापना करण्यात यावी व त्यात 500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी, ब्राह्मण समाजावर होणारी जातीय चिखलफेक थांबविण्यासाठी व महापुरूषांची होणारी बदनामी थांबविण्यासाठी कायदा करण्यात यावा, संसद भवन येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात यावा, पुण्यातील शनिवार वाडा येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे शौर्य व युध्दाच्या इतिहासाचे संग्रहालय व पेशवे सृष्टी स्थापन करण्यात यावी, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

प्रत्येक जिल्ह्यातील ब्राम्हण समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह बांधून द्यावे, पुरोहितांना मासिक पाच हजार मानधन देण्यात यावे, वर्ग-2 च्या इनाम जमीनी वर्ग-1 करुन विकसीत करण्याचा अधिकार द्यावा, भगवान परशुराम मंदिरासाठी विशेष धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी ब्राह्मण महाशिखर परिषदेतर्फे (Brahmin Mahashikhar Parishad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष अशोक वाघ, रेखा कुळकर्णी यांच्यासह ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कमलाकर फडणीस, नितीन कुळकणी, भूषण मुळे, स्वाती कुळकर्णी, व्ही.पी. कुळकर्णी, अजित नांदेडकर, अमोल जोशी, हेमंत वैद्य, छाया वाघ, मानिनी तपकिरे, वसंतराव देखणे, सत्यनारायण खटोड, अजय जोशी व ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते. यावेळी आमदार राजूमामा भोळेंनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

वैद्यकीय प्रतिनीधी असोसिएशन

दोन दिवसीय देशव्यापी संपात महाराष्ट्र सेल्स आणि मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या (Maharashtra Sales and Medical Representative Association) नेतृत्वाखाली वैद्यकीय प्रतिनीधीही (Medical Representative) सहभागी झाले होते.

सर्व चार श्रम संहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी अधिनियम 1976 चे कार्यान्वयन सुनिश्चित करा, औषधी आणि वैद्यकिय उपकरणांवर शुन्य टक्के जीएसटी आकारा, आरोग्य क्षेत्रावरील एकूण देशांतर्गत उत्पादने पाच टक्के वाटप करा. आणि औषधांची ऑनलाईन विक्री थांबवा, औषधांच्या किंमतींवर मर्यादा घाला. सद्याच्या बाजार आधारीत किंमत प्रणालीत बदल करा, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांव्दारे वैद्यकिय आणि विक्री प्रतिनिधी डॉक्टर आणि केमिस्ट यांच्या नागरी स्वातंत्र्यावर अंकुष ठेवणार्‍या औषध श्रेत्रातील कंपन्यांवर कठोर कारवाई करा, औषध क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी शिक्षेच्या कलमांसह विपणाची वैधानिकक संहिता तयार करा, वैद्यकिय आणि विक्री प्रतिनिधींना 26 हजार रुपये किमान वेतन जाहीर करा, इंधन दर कमी करा.

यासह इतर मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनीधींनी निदर्शने करीत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनीधी सहभागी झाले असल्याचे शाखा सचिव संदीप पाटील यांनी सांगितले. या आंदोलनात अमोल कुळकर्णी, रवींद्र अहलुवालिया, सागर घटक, चंपालाल पाटील, चेतन पाटील, महेश चौधरी, मनिष चौधरी, दिनेश जगताप, विशाल चौधरी, राजेश पोतदार यांच्यासह जिल्ह्यातील 650 वैद्यकिय प्रतिनिधी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या