Tuesday, May 7, 2024
Homeदेश विदेशरेल्वे भरतीचा वाद पेटला; प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली, स्टेशनवर दगडफेक

रेल्वे भरतीचा वाद पेटला; प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली, स्टेशनवर दगडफेक

दिल्ली | Delhi

बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोंधळाची स्थिती कायम आहे. भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज केला. तर काही ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला. दरम्यान, गयामध्ये उद्रेक झालेल्या तरूणांनी प्रजासत्ताक दिनी दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. ट्रेनमध्ये लावण्यात आलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निदर्शकांनी रिकाम्या ट्रेनच्या बोगीला आग लावल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर दुसरी बोगीही पेटवण्यात आली. यादरम्यान आरपीएफने एका आंदोलकाला घटनास्थळावरून पकडले. पकडण्यात आलेला आरोपी हा प्रथमदर्शनी विद्यार्थी उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वे मंत्रालयातील रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात घोटाळ्या कऱण्यात आल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी बिहारमधील विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलनही सुरू केलं आहे.

मंगळवारी सीतामढीमध्ये तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हवेत गोळीबार करून दूर सारलं होतं. प्रचंड विरोध पाहता, रेल्वेने बुधवारी सकाळीच एनटीपीसी आणि ग्रुप डी (श्रेणी-१) परीक्षा स्थगित करण्याची घोषणा केली होती.

मात्र रेल्वेच्या या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांचा संताप थांबलेला नाही. संपूर्ण बिहारमध्ये विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या