Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधशिक्षक व्हायचेय मला...

शिक्षक व्हायचेय मला…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

- Advertisement -

खूप दिवसांपासून प्रथमेशला त्याची बहीण प्रज्ञाने त्याच्या कोणत्या आवडींविषयी लिहिले असेल, याची उत्सुकता होती. त्यामुळे त्याने आज ठरवले होते की, प्रज्ञाने आवडींविषयी लिहिलेली कागदाची चिठ्ठी आज उघडून पाहायचीच. प्रथमेशने चिठ्ठी उघडली आणि वाचू लागला, शिकवणे, मार्गदर्शन करणे, सायकल चालवणे आणि तबलजी. ‘तबलजी’ हा शब्द वाचताच प्रथमेश चिडलाच. तितक्यात आजोबा आले आणि दोघांना म्हणाले, झाले का सुरू तुमचे भांडण. तुम्हाला भांडल्याशिवाय होत नाही का? आजोबांनी असे म्हणताच दोघे शांत झाले. प्रज्ञाने आजोबांना विचारले, आजोबा, तबला वाजवणार्‍या वादकाला ‘तबलजी’ म्हटले तर माझे काय चुकले? आजोबांनी प्रथमेशला जवळ बोलावून सांगितले, कलेला व कलाकाराला वयाचे बंधनच नसते. कलाकार लहान असो किंवा मोठा तो कलाकारच असतो. प्रज्ञाने ‘शिकवण्याची आवड’ लिहिले होते. त्यामुळे प्रथमेश विचार करू लागला. प्रज्ञाने मी ‘शिक्षक’ होणार हे कशावरून ठरवले असेल. त्याने आजोबांना प्रज्ञाने लिहिलेला आवडींचा कागद दिला आणि विचारले, आजोबा, यात चिंगेने बघा काय लिहिले आहे? मला शिकवण्याची आवड आहे. प्रज्ञाला चिंगे म्हणताच आजोबांनी त्याला दटावले. तुला घरात पुन्हा तुफान आणायचे आहे का? बरे झाले तिने ऐकले नाही आणि दोघे हसू लागले. प्रथमेशच्या प्रश्नावर आजोबांनी सांगितले, तुला छान पटवून देता येते. तू तुझ्या टीममध्ये लीडर असतो. तू सांगितलेले इतरांना पटते. प्रज्ञाच्या शंकांना तू छानपैकी उत्तरे देऊन पटवून सांगतोस म्हणून तिला तू भविष्यात शिक्षक होऊ शकशील, असे वाटणे साहजिकच आहे.

आजोबा, सगळे तर मला ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ होशील असेच म्हणतात आणि मग ‘शिक्षक’ कसा काय होणार? बरोबर आहे तुझे म्हणणे, पण तुला ठाऊक आहे का? इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे इंजिनिअरच असतात. एवढेच की तुम्ही त्यांना प्राध्यापक, व्याख्याते असे म्हणतात. शिक्षक, प्राध्यापक होणे खरे तर खूप सन्मानाचे होय. हजारो विद्यार्थ्यांना घडवून देशाच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारे फक्त शिक्षकच असतात. शिक्षकांमुळेच डॉक्टर, इंजिनिअर, लेखक, कलाकारपासून ते वेल्डर, इलेक्ट्रशियन, प्लंबर अशा कोणत्याही क्षेत्रात सुजाण नागरिक घडत असतात आणि देशाची प्रगती होत असते. त्यामुळे शिकवणे ही कला ज्याच्याकडे आहे तो त्या क्षेत्रातला महान गुरू असतो. तुला एक गोष्ट सांगतो त्यावरून लक्षात येईल. ‘वर्‍हाड निघालं लंडनला’ हा एकपात्री प्रयोग तू पाहिला आहेस ना! तर मग एकदा हा प्रयोग परदेशात असताना लक्ष्मण देशपांडे व त्यांच्या पत्नी दोघेही जपानच्या विमानतळावर उतरलेत आणि पुढील विमानात बसण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करताना तेथील अधिकार्‍याने त्यांच्याकडे ओळखपत्र व इतर महत्त्वाची कागदपत्रे मागितली असता लक्षात आले की, काही कागदपत्रे आधीच्या विमानतळावरील अधिकार्‍याकडेच विसरलोत. आता काय करायचे? या विचारात असतानाच त्यांनी दुभाष्याच्या मदतीने सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही. विमान उड्डान घेण्यास दहाच मिनिटे होती, तितक्यात तेथील एका अधिकार्‍याने सौ. देशपांडे यांना विचारले, थहरीं यावर सौ. देशपांडे म्हणाल्या, ‘टीचर’ हा शब्द ऐकताच त्या अधिकार्‍याने त्यांचे लगेज हातात घेतले आणि सन्मानपूर्वक त्यांना विमानात बसवून पुनःपुन्हा त्यांची माफी मागीतली. शिक्षक खोटे बोलू शकत नाही. यावर जपानी माणसांचा असलेला ठाम विश्वास आणि त्यामुळे शिक्षकांना मिळणारा सन्मान यामुळेच जपान हा देश प्रगतिपथावर पोहोचला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या