Friday, May 3, 2024
Homeनाशिकफसवणुकीतील रक्कम परत मिळवण्यात यश

फसवणुकीतील रक्कम परत मिळवण्यात यश

नाशिक | Nashik

क्रेडीट कार्ड व त्याचा आेटीपी विचारून तक्रारदाराच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख रूपये काढल्यावर हे पैसे एका वाॅलेट आणि गेमिंग अॅपच्या माध्यमातून पुढे जात असल्याचे लक्षात येताच नाशिक सायबर पाेलीसांनी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून हे पैसे फ्रीज करून तक्रारदाराला मिळवून दिले आहे. याबाबत तक्रारदाराने सायबर पाेलीसांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७३ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात येऊन संशयिताने क्रेडीट कार्डची माहिती व आेटीपी घेऊन बँक खात्यातून एक लाख रुपये काढून फसवणूक केली.

दरम्यान, तक्रारदाराचे ७० हजार रूपये हे कॅश फ्री रिटेल या वाॅलेटवर तर ३० हजार रूपये एमपीएल या गेमींग अॅपवर गेले असल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले. पैसे परत मिळण्याची शक्यता असल्याने पाेलीसांनी कॅश फ्री व व एमपीएल व्यवस्थापनाला ताबडतोब इ-मेल केले तसेच त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क केला.

त्यामुळे तक्रारदाराचे पैसे फ्रिज वा होल्ड करून १ लाख रुपये वाचवण्यात यश आले. तसेच फसवणूक करणाऱ्या एमपीएलच्या अकाउंटमध्ये तक्रारदारांचे ३० हजार आधिक ८० हजार असे एकूण १ लाख १० हजार रूपये होल्ड करण्यात आले आहे.

त्यामुळे इतर फसवणूक झालेल्या लोकांचे ८० हजार रुपये वाचवण्यातही यश आले आहे. तक्रारदाराला फसवणूक झालेले संपूर्ण १ लाख रुपये परत मिळाल्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात येऊन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या