Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuccess Story : मेंढपाळाचा लेक झाला IPS अधिकारी; मेंढ्या चारत असतानाच लागला...

Success Story : मेंढपाळाचा लेक झाला IPS अधिकारी; मेंढ्या चारत असतानाच लागला निकाल, Video पाहून डोळ्यात येईल पाणी

मुंबई | Mumbai

आयुष्यात वाटचाल करत असताना संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला हा येतच असतो. मात्र, त्या संघर्षावर मात करून काहीजण जिद्दीने यश मिळवतात. यामुळे तुमचा आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाची पाऊलखूण असतो, असे म्हटले जाते. याच संघर्षावर मात करत एका मेंढपाळाच्या मुलाने युपीएससी परीक्षेत (UPSC Exam) उत्तीर्ण होत आयपीएस पदाला गवसणी घातली आहे.

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) कागल तालुक्यातील (Kagal Taluka) यमगे गावातील बिरदेव सिध्दाप्पा डोणे यांनी घरात कोणतीही सुविधा किंवा शिक्षणाचे वातावरण नसतांना मनाशी बाळगलेले अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव यांनी देशात ५५१ वी रँक मिळवत आयपीएस होण्याचा बहुमान मिळवला आहे.

बिरदेव डोणे (Birdev Done) यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्यांचा परिवार मेंढपाळीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करतात. विविध गावात भटकंती करून मेंढरांना चारून प्रतिकूल परिस्थितीतून आयपीएस होणे हा बिरदेव यांचा संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या हुशारीच्या बळावर हे घवघवीत यश मिळविले आहे.

बिरदेव सिध्दाप्पा डोणे यांनी याआधी दोनदा युपीएससीची परीक्षा दिली होती.पण यात त्यांना यश मिळाले नव्हते, मात्र त्यांनी हार मानली नाही. गेल्यावर्षी त्यांनी तिसऱ्या वेळेस युपीएससीची परीक्षा दिली. यानंतर देशात ५५१ वा रँक मिळवत
त्यांनी उत्तूंग यश मिळवले आहे. आपल्या मुलाच्या या यशानंतर वडिलांनी (Father) फेटा बांधून बिरदेव यांचे अभिनंदन केले.

घरात जागा नसल्याने शाळेचा व्हरांड्यातच अभ्यास करायचा

बिरदेव हे दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्यांनी आयपीएस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. यानंतर बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर त्याने पुणे सीओइपी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. बिरदेव यांचे बालपण डोंगरदऱ्यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अंभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांड्यात अभ्यासामध्ये व्यस्त असायचे.

 

 

 

 

 

 

 

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...