Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedसेवा हक्क कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करा-आयुक्त दिलीप शिंदे

सेवा हक्क कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करा-आयुक्त दिलीप शिंदे

औरंगाबाद – aurangabad

महाराष्ट्र (maharastra) राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सेवा हक्क कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिल्या.

- Advertisement -

राज्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विभागीय सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘आपली सेवा आमचे कर्तव्य’ हे आयोगाचे घोषवाक्य असून त्यानुसार काम करत असताना ऑनलाईन सेवा पुरवण्यातून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे. अधिसूचित करण्यात आलेल्या ५११ सेवांपैकी आतापर्यंत ३८७ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून भविष्यात सर्वच सेवा ऑनलाईन करणे, आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणे, शासनाच्या सर्व सेवांचे आपले सरकार या एकल संकेतपीठावर एकत्रिकरण करणे आदींसाठी आयोग प्रयत्नशील आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या