Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी विद्यापीठाचे कुलसचिव वाघ यांचे अचानक निलंबन

राहुरी विद्यापीठाचे कुलसचिव वाघ यांचे अचानक निलंबन

राहुरी (प्रतिनिधी)

येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहनराव रामभाऊ वाघ यांचे अचानक निलंबन पत्र विद्यापीठ प्रशासनामध्ये येऊन धडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यापीठामध्ये निलंबनाच्या कारवाईबाबत वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, विद्यापीठाचे कामकाज सुरू असतानाच अचानकपणे प्रशासनामध्ये कुलसचिव वाघ यांचे निलंबन करण्यात आल्याचे पत्र कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्याकडून मिळाले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. नेमके निलंबनाचे कारण गुलदस्त्यात असल्याने याबाबत विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झडत आहे.

दुधात भेसळ करणारा डेअरीचालक गजाआड

विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी निलंबन प्रकरणाची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे. विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुलगुरू यांच्याकडून कुलसचिवपदावरील व्यक्तीचे निलंबन केल्याची घटना घटना घडली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुलसचिवपदाचा कारभार महानंद माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कुलसचिव वाघ यांनी सन 2020 मध्ये पदग्रहण केले होते. वाघ यांचा कार्यकाळ जून 2021 पर्यंत होता. त्यापूर्वीच त्यांचे निलंबन होऊन कुलसचिवपदी महानंद माने यांना पदभार सोपविण्यात आला आहे.

मागील काही काळामध्ये विद्यापीठामध्ये बदल्यांबाबत कुलसचिव व इतर अधिकार्‍यांची चौकशी व्हावी, अशी मागणी कुलसचिव वाघ यांनी कारभार हाती घेण्यापूर्वी काही सामाजिक संघटनांनी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या