Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकचे पोलीस आयुक्त करणार आ. कांदे, निकाळजे प्रकरणाची चौकशी

नाशिकचे पोलीस आयुक्त करणार आ. कांदे, निकाळजे प्रकरणाची चौकशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आ. सुहास कांदे (Suhas Kande) आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात रंगलेल्या वादाला अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांनी नवे वळण दिले होते…

पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचा अहवाल आता पोलीस आयुक्तांकडे आला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पोलीस आयुक्त दोघांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवत सुनावणी करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

जिल्हा नियोजन निधीबाबत असलेला विषय असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त पांडेय यांनी आमदार कांदे आणि निकाळजे यांचे जबाब नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीत कॉल रेकॉर्डिंग द्यायला दोघेही असमर्थ असल्याने आता पोलीस आयुक्त चौकशीअंती काय निर्णय घेता हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव असल्याने पोलीस आयुक्तांनी हें प्रकरण गांभीर्याने घेत नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दोघांचे जबाब नोंदवून स्वतः चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोघांच्याही चौकशीतून नेमके काय बाहेर येणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा नियोजन समितीचा निधी मतदारसंघाला कमी दिल्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुध्द शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे.

ही याचिका मागे घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना अक्षय निकाळजे यांनी फोनवरुन धमकावल्याची तक्रार कांदे यांनी केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ही चौकशी गंगापूर रोड पोलिसांकडून (Gangapur Road Police) झाली असून त्याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला आहे.

आमदार कांदे आणि निकाळजे यांनी पत्रकार परिषदा घेत वस्तुस्थिती सांगितली होती. मात्र, चौकशीदरम्यान, याबाबतच्या कॉल रेकॉर्डिंग्ज ते पोलिसांना सुपूर्द करणार होते. मात्र, असे कुठलेही पुरावे त्यांना देता आले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या