Tuesday, May 27, 2025
Homeदेश विदेशSuicide News : एकाच कुटुंबातील सात जणांनी संपवलं आयुष्य; सुसाईड नोटही सापडली,...

Suicide News : एकाच कुटुंबातील सात जणांनी संपवलं आयुष्य; सुसाईड नोटही सापडली, कारण काय?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

हरियाणातील (Haryana) पंचकुला शहरातील सेक्टर २७ मध्ये एकाच कुटुंबातील (Same Family) सात सदस्यांनी गाडीमध्ये बसून विष प्राशन करत सामूहिक आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांना गाडीतच सुसाईड नोट सापडली असून, त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख केलेला आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृतांमध्ये देहरादूनमधील रहिवासी प्रवीण मित्तल (४२), त्यांचे पालक, पत्नी आणि तीन मुले (दोन मुली आणि एक मुलगा) यांचा समावेश आहे. सर्वांचे मृतदेह (Death) घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंब आधी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. देहरादूनहून ते पंचकुलात गेले होते. कथा ऐकून परतल्यानंतर त्यांनी कारमध्येच आत्महत्या केली. सध्या पोलिसांनी सातही मृतदेह खासगी रुग्णालयाच्या (Private Hospital) शवगृहात ठेवले आहेत.

दरम्यान, प्रवीण मित्तल यांनी अलीकडेच टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय अधिक चांगला करण्यासाठी यात त्यांनी बराच खर्च केला होता. मात्र, यामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. व्यवसाय चालला नाही. आपल्याकडील सर्व पैसे त्यांनी या व्यवसायात गुंतवले होते. त्यांच्यावर प्रचंड कर्जही होते. त्यांच्याकडे घरखर्च होईल इतकेही पैसे नव्हते. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा (Police) प्राथमिक अंदाज आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडलं; सहा जणांचा जागीच...

0
मुंबई | Mumbai बीड जिल्ह्यातून (Beed District) जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच...