Friday, May 3, 2024
Homeजळगावमेहुणबारे येथे विवाहितेची आत्महत्या

मेहुणबारे येथे विवाहितेची आत्महत्या

चाळीसगाव – Chalisgaon – प्रतिनिधी :

तालुक्यातील मेहुणबारे येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुलांना कपडे घेण्यासाठी घरच्यांनी कमी पैसे दिले याचा राग येवून 32 वर्षीय विवाहीतेने छताला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्देवी घटनेने मयत विवाहीतेचे मुलांसह कुटुुंब मात्र उघड्यावर पडले.

- Advertisement -

मेहूणबारे बजार पट्टा भागात राहणाऱ्या सिमा उर्फ जिजाबाई गोरख सोनवणे (32) हिने मुलांच्या कपडे खरेदीकरीता पैसे कमी दिल्याचा राग येवून स्वत:च्या घरी छताचे लाकडी खांबास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही दुर्देवी घटना दि.रविवार दि.15 रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गोरख दगा सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय जालमसिंग पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या