Tuesday, July 2, 2024
Homeक्राईमNashik Niphad News : सोनेवाडीत विवाहितेची आत्महत्या

Nashik Niphad News : सोनेवाडीत विवाहितेची आत्महत्या

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

उगाव | वार्ताहर | Ugaon

- Advertisement -

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) सोनेवाडी बु येथील विवाहितेने (Married) आपल्या मुलासह शेततळ्यात (Shet Tale) आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : स्कूल बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, सुजाता भूषण निचित (२६) व गुरु भूषण निचित (२) असे आत्महत्या केलेल्या मायलेकाची नावे आहेत. या विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याची अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

हे देखील वाचा : मोठी बातमी! लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

तसेच मायलेकांनी आत्महत्या केल्याची घटना समजताच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत शेततळ्यातून मृतदेह (Dead Body) बाहेर काढले. यानंतर पुढील उत्तरीय तपासणीसाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात (Nipahd Hospital) दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पैशांची पाकिटे असलेल्या एकास पोलिसांनी रंगेहाथ पकडले

दरम्यान, मयत विवाहितेचे माहेर हे निफाड तालुक्यातील गाजरवाडी (Gajarwadi) येथील असून सासरच्या मंडळींनी घातपात केलाच्या आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी सासरच्यांविरोधात निफाड पोलिसात (Niphad Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या