Sunday, May 19, 2024
Homeजळगावबांधकामाच्या कारणावरून पारंबी येथील तरुणाची आत्महत्या

बांधकामाच्या कारणावरून पारंबी येथील तरुणाची आत्महत्या

मुक्ताईनगर Muktainagar

तालुक्यातील पारंबी (Parambi) येथील 29 वर्षीय तरुणाने (youth) बांधकामाच्या वादावरून (construction dispute) स्वतःच्या मनगटांच्या नसा कापून विहिरीत उडी ((Jumping into the well)) घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज सकाळी पावणे सहा वाजता घडली. दरम्यान एका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत मुक्ताईनगर येथील पोलिसात मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथील उखर्डा बळीराम गवाळ वय साठ वर्षे यांनी फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीत म्हटले आहे की मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथे शेजारीच राहणाऱ्या हरिचंद भिकाजी दाणे यांच्यासोबत गेल्या आठ दिवसापासून बांधकाम करण्याच्या कारणावरून फिर्यादीचा मुलगा विशाल उर्फ गोलू याचा वाद सुरू होता त्यामुळे विशाल उर्फ गोलू उखर्डा गवाळ (वय 29 वर्षे ) हा पारंबी गावच्या बाहेर काकोडा रोडवर शौचाला जातो असे सांगून गेला.

परंतु पारंबी शिवारातील बाळू त्र्यंबक दाणे यांच्या शेतातील विहिरीत स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येस व मरणास हरिचंद भिकाजी दाणे हे कारणीभूत आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून हरिचंद्र भिकाजी दाणे राहणार पारंबी यांच्याविरुद्ध भा.द.वि.कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर हे करीत आहेत.

दरम्यान, या घटनेतील मयत असलेल्या विशाल उर्फ गोलू या तरुणाच्या पश्चात एक लहान भाऊ व एक विवाहित मोठी बहीण , आई , वडील असा परिवार आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोपीस अटक

दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आले असून उद्या त्यास न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

दरम्यान , आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्या का करीत आहे याचे कारण विशाल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भ्रमणध्वनीद्वारे प्रसारित केल्याचे समजते त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या