Sunday, May 5, 2024
Homeजळगावशिरसोलीतील तरुणाची आत्महत्त्या

शिरसोलीतील तरुणाची आत्महत्त्या

जळगाव- jalgaon

तालुक्यातील (shirsoli)_शिरसोली प्र.न.येथील पुनमचंद श्रावण बारी वय ४० या तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. दोन ते तीन दिवसांपूर्वी मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत बारी यांची शिरसोली स्टॉपवरील पानटपरी जमीनदोस्त झाली होती. या नुकसानामुळे नैराश्यातून बारी यांनी जीवन संपविल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

१४ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजता भरधाव वेगाने येणारी एम.एच.२० ई.एल.७५८१ क्रमांकाची मालवाहू पिकअप लक्ष्मी पानटपरीला धडकली होती. यात पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे पानटपरी मालक पुनमचंद श्रावण बारी तणावात होते. पानटपरीची नुकसान भरपाई देतो असे मालवाहू पिकअप वाहन मालकाने पहिले सांगितले होते. नंतर दोन दिवसांनी मात्र पिकअप वाहन मालकोन नुकसान भरपाई देण्यात नकार दिल्यानंतर पुनमचंद बारी प्रचंड नैराश्य होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचे पानटपरी हेच एकमेव साधन होते.

शेवटी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २० वर्षांपासून ज्या पानटपरीवर पुनमचंद बारी यांचा उदरनिर्वाह होता. ती पानटपरी आता जमीनदोस्त झाली व आपल्यावर असलेले कर्ज कसे चुकवावे अशा प्रकारे बारी तणावात होते. त्यामुळेच नैराश्यातून बारी यांनी आज सकाळी ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ भाऊ, १ बहिण, आई – वडील असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या