Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSunetra Pawar : राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज

Sunetra Pawar : राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या (Rajyasabha) जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar Ncp) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मुंबईतील विधानभवनात जाऊन राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sunetra Pawar : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज

YouTube video player

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून बारामती लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार अशी चर्चा सुरू होती. त्यासोबतच राज्यसभेच्या या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांचीही नावे चर्चेत होती. यानंतर काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

हे देखील वाचा : ‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…’ ;रोहित पवारांचा अजित पवारांना सल्ला

त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विधानभवनात (Vidhan Bhavan) जाऊन राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले,”मी नाराज…”

दरम्यान, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राज्यसभेसाठी इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर भुजबळ यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो. पंरतु, माझ्याबरोबर आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी यांच्यासह आणखी नेते इच्छुक होते. पंरतु, शेवटी चर्चेअंती आम्ही सगळ्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने नाराज नाही”, असे भुजबळ यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...