Wednesday, May 8, 2024
Homeनगरसुप्यात गड आला पण सिंह गेला

सुप्यात गड आला पण सिंह गेला

सुपा | वार्ताहर

पारनेर तालुक्यातील महत्वाची असणार्‍या सुपा ग्रामपंचायत निवडणुकीत राजू शेख यांच्या पॅनलचा विजय झाला आहे.

- Advertisement -

15 जागांपैकी शेख यांचे 8 उमेदवार निवडून आले असले तरी या निवडणुकीत पॅनल प्रमुख शेख याचा धक्कादायक पराभव झाला आहे. विरोधी माजी सभापती दीपक पवार यांच्या पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले असून अपक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर मैड यांचा सुपा ग्रामपंचायत सदस्यपदी विजय झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या