Wednesday, September 9, 2026
HomeनगरCrime News : सुपा पोलिसांकडून सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद

Crime News : सुपा पोलिसांकडून सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद

सुपा, नगर तालुका हद्दीतील दरोड्यांची उकल || चौघांना अटक

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दरोडे टाकणार्‍या सराईत टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी देवा उर्फ पावल्या कैलास काळे (वय 35, रा. कडुस-पाडळी, ता. पारनेर, ह. रा. सुंदर सृष्टी, शिरूर) याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या कबुलीनंतर संयुक्त कारवाईत रमेश सावत्या भोसले (वय 38, रा. पिंपळगाव कौडा), प्रविण सुरेश भोसले व शरद कैलास काळे (रा. कडुस-पाडळी) यांनाही अटक करण्यात आली. आरोपींकडून 99 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

- Advertisement -

दि. 24 जुलै रोजी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देवा उर्फ पावल्या काळे याला शिरूर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने रायतळे, शहाजापूर व हंगा येथे दरोडे टाकून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची तसेच कामरगाव येथील मंदिरातील देवीचे दागिने व मुकुट चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, अविनाश सावत्या भोसले, सुशांत सुरेश भोसले, अनिल सुरेश भोसले, आवेश निरप्या भोसले, लोंढ्या निरप्या भोसले, प्रविण सुरेश भोसले, राम उर्फ बोकड्या उर्फ बन्या लखन काळे व शरद कैलास काळे सहभागी असल्याचे त्याने सांगितले.

सुपा, पारनेर, नगर तालुका पोलीस ठाणे व दक्षिण मोबाईल सेलच्या पथकाने संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन करून वरीलपैकी रमेश सावत्या भोसले, प्रविण सुरेश भोसले व शरद कैलास काळे यांना अटक केली. आरोपी देवा उर्फ पावल्या कैलास काळे याच्यावर 23, रमेश सावत्या भोसले याच्यावर 30, तर शरद कैलास काळे याच्यावर 24 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी तसेच सुपा, पारनेर व नगर तालुका पोलीस ठाण्यांच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी केली.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...