Friday, May 3, 2024
Homeजळगावपोलीस अधीक्षकांकडून रामानंदनगर पोलीस ठाण्याचा आढावा

पोलीस अधीक्षकांकडून रामानंदनगर पोलीस ठाण्याचा आढावा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरुवार, 17 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्रत्येक कर्मचार्‍यासह पोलीस ठाण्याच्या कामगिरीचा आढावा घेतला.

- Advertisement -

पोलीस अधीक्षकांच्या इन्स्पेक्शनमुळे सर्व पोलीस कर्मचारी गणवेशात तसेच कधीही दिसून न येणारे दांडी बहाद्दर कर्मचारीही पोलीस ठाण्यात हजर असल्याचे दिसून आले.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हयाचा दौरा केला.

इन्स्पेक्शन करुन त्यांनी जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा वार्षिक आढावा घेतला. त्याच पार्श्वभूमिवर आता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडून शहरातील पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्शन करण्यात येत आहे गुरुवारी पोलीस अधीक्षक आढावा घेण्यासाठी सकाळीच रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले.

यादरम्यान त्यांनी प्रत्येक कर्मचार्‍याकडे तपासासाठी असलेले गुन्हे, प्रलंबित गुन्हे, कर्मचार्‍याची हजेरी, कामगिरी तपासली. कामगिरी तपासून त्यापध्दतीने शेरा मारला. याचवेळी पोलीस अक्षीकांनी प्रलंबित गुन्ह्याचा निपटारा करण्याचीही तंबी दिली.

पोलीस अधीक्षकांच्या वार्षिक इन्स्पेक्शनमुळे कधीही गणवेशात न दिसणारे कर्मचारीही आज गणवेशात दिसून आले. तपासाला असलेले गुन्हे प्रलंबित असल्याने अनेक कर्मचार्‍यांमध्ये धडकी भरल्याचेही दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या