Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशSC मधील वकिलाची हत्या, बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; बंगल्यात लपलेल्या पतीला पोलिसांनी...

SC मधील वकिलाची हत्या, बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; बंगल्यात लपलेल्या पतीला पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली | New Delhi

नोएडा येथे सुप्रीम कोर्टातील (Supreme Court Advocate Murderd) महिला वकिलाची हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ६१ वर्षीय रेणु सिन्हा यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील बाथरुममध्ये आढला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली होती. त्यामुळेच हे प्रकरण खुनाचे आहे हा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता. आता या प्रकरणात त्यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी रेणू सिन्हा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रेणू सिन्हा यांच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस घटना स्थळी आले. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना आत रेणू यांचा मृतदेह पडल्याचे आढळले. रेणू सिन्हा यांच्या भावासह कुटुंबाने त्यांच्या पतीनेच ही हत्या केली असावी हा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, रेणु सिन्हा यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला होता. पोलीस रेणु सिन्हा यांच्या पतीचा शोध घेत असतानाच कोठीमधील स्टोअर रुममध्ये तो लपून बसल्याचे समोर आले. पोलिसांना अखेर त्याला शोधण्यात यश आले आहे. हत्येनंतर मागील २४ तासांपासून पती स्टोअर रुममध्येच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. नितीन सिन्हा असे रेणू सिन्हा यांच्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी नितीनला अटक केली आहे.

नोवाक जोकोविचने रचला इतिहास; २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरत बनला युएस ओपनचा बादशाह

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या रेणू सिन्हा या पाटण्याच्या होत्या. त्या पतीसह नोएडातील सेक्टर ३० मध्ये राहात होत्या. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो. तसेच त्यांना कर्करोगानेही ग्रासले होते. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. रेणु सिन्हा यांच्या भावाने पोलिसांकडे धाव घेत बहिण फोन उचलत नसल्याने शंका उपस्थित केली होती.

दरम्यान पोलीस दरवाजा तोडून घरात घुसले होते. यावेळी शोध घेतला असता बाथरुममध्ये रेणु सिन्हा यांचा मृतदेह पडलेला होता. रेणु यांच्या कानाजवळ जखमेच्या खुणा आहेत. पोलिसांनी संशय असल्याने रेणु सिन्हा यांच्या पतीला फोन केला असता, तो बंद होता. यानंतर हा संशय बळावला होता. दरम्यान, पोलिसांनी रेणु सिन्हा यांच्या पतीला ताब्यात घेतलं असून तपास सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या