Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई | Mumbai

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी दिवसेंंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून नितेश राणे यांनी येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही निराशाच पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचा आरोप शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर लावला आहे. तसेच राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील आमदार नितेश राणे यांचे एक कृत्य पाहायला मिळाले होते. विधान सभेच्या पायऱ्यावर बसुन भाजप नेत्यांनी मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात जात असताना म्याव म्यावचा नारा दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या